Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nutritious Diet: बाळाला स्तनपान करत असाल तर आहारात करा हे बदल; जाणून घ्या अधिक माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 5 December 2025, 15:33

पुणे: बाळाला स्तनपान (Nutritious Diet) देणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ असतो. या काळात आईने घेतलेला आहार हा थेट बाळाच्या पोषणावर परिणाम करत असतो. बाळाला आवश्यक असलेले सर्व घटक आईच्या दुधातून मिळतात, त्यामुळे आईने स्वतःच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी, दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि स्वतःच्या हाडांचे आरोग्य जपण्यासाठी स्तनपान करणाऱ्या मातांना कॅलरी, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा योग्य समतोल राखणे आवश्यक आहे.

१. स्तनपान करणाऱ्या मातांना दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी, काय करावे?

स्तनपान करणाऱ्या मातांना दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि स्वतःची ताकद टिकवून ठेवण्यासाठी प्रथिनांची जास्त गरज असते. मांस, अंडी, मासे (सीफूड), लो फॅट दुग्धजन्य पदार्थ (दूध, दही, पनीर), तसेच विविध कडधान्ये जसे की, मूग डाळ, तूर डाळ, सोयाबीन, आणि मोड आलेले कडधान्ये यांचा आहारात नियमित समावेश करा. प्रथिने आईला ऊर्जा देतात आणि बाळाच्या पेशींच्या वाढीस मदत करतात.

२. भरपूर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश

हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, आणि फोलेट सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांचा साठा असतो, जे मातांसाठी आणि बाळासाठी अत्यंत आवश्यक आहेत. पालक, मेथी, शेपू, आणि मोहरीची पाने यांसारख्या पालेभाज्या दररोज आहारात असाव्यात. या भाज्या स्तनपान करणाऱ्या मातांचे दूध वाढवण्यासाठी प्रभावी मानल्या जातात. तसेच, लोह कमतरतेमुळे होणाऱ्या ॲनिमियाचा धोका कमी होतो.

३. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक

स्तनपानादरम्यान आईच्या शरीरातील कॅल्शियम दुधातून बाळाकडे जाते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा योग्य पुरवठा होणे गरजेचे आहे. दुग्धजन्य पदार्थ (दही, पनीर, चीज) आणि व्हिटॅमिन डीसाठी सूर्यप्रकाश =तसेच व्हिटॅमिन-डी युक्त सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या. व्हिटॅमिन-डी शरीरात कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत करते.

 

४. पाण्याची मात्रा वाढवा

स्तनपानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरातील द्रव पातळी (Fluid Level) योग्य राखणे आणि दुधाचे उत्पादन व्यवस्थित होण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तुम्ही बाळाला जितक्या वेळा दूध पाजता, तितक्या वेळा किमान एक ग्लास पाणी नक्की प्या. ताक, सूप, फळांचे रस आणि ओट्सचे पेज यांसारखे पदार्थ देखील शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करतात.

५. ओट्स आणि संपूर्ण धान्य

ओट्स आणि संपूर्ण धान्ये ऊर्जेचा चांगला स्रोत आहेत आणि त्यामध्ये भरपूर फायबर असते. न्याहारीसाठी ओटमील किंवा ओट्स कुकीज खाण्याचा प्रयत्न करा. तसेच, पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राऊन राईस, गव्हाची भाकरी यांसारख्या संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा. ओट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि संपूर्ण धान्ये बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात.

टीप: स्तनपान करताना मातांनी कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा (Dietitian) सल्ला घ्यावा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

Food Safety: मांस-मासे साठवताना सावधान! चिकन, मटण आणि मासे फ्रीजमध्ये किती दिवस ठेवणे सुरक्षित? जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp