पुणे : 2026 च्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा अखेर झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारांचे रक्षण करणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नवनेथम नावी पिल्लई यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कायदा मजबूत करणे आणि जगभरात शांततेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन नोबेल समितीने हा निर्णय घेतला आहे.

नावी पिल्लई यांचा जन्म 23 सप्टेंबर 1941 रोजी दक्षिण आफ्रिकेत एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा 1890 च्या सुमारास भारतातून दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात पहिल्या कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश म्हणून काम पाहिले. याशिवाय, रवांडा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात न्यायाधीश तसेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यात नेल्सन मंडेला यांच्यासारख्या अनेक मोठ्या नेत्यांचे न्यायालयात प्रतिनिधित्व केले. इतकेच नव्हे तर गाझामधील लष्करी कारवायांवर प्रश्न उपस्थित करत युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार असणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी त्यांनी सतत आवाज उठवला. सीमांच्या पलीकडे जाऊन मानवाधिकार टिकवून ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे.

दरम्यान, यावर्षी देखील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. नवनेथम नावी पिल्लई यांना हा सन्मान मिळाल्यामुळे जगभरातून आणि विशेषतः भारतीय समुदायाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








