नागपूर : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचलनालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आल आहे. यावरून काँग्रेसमध्ये वातावरण चांगलंच तापलं असून काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे.आज नागपूर शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. आजच्या पदयात्रेत दीक्षाभूमी, ताजुद्दीन बाबा आणि टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले. या मोर्चात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनिया आणि राहुल यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही असही स्पष्ट त्यांनी सांगितलं.