कोतवाली, (अहमदनगर) : Nagar Crime कोतवाली पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहेत. (Nagar Crime)
तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे पुढीलप्रमाणे
विकास दिलीप खरपुडे, (वय-२५, रा बुरुडगाव रोड, अहमदनगर) व सुनिलसिंग जितसींग जुन्नी (वय – २६, रा काटवन खंडोबा संजयनगर, अहमदनगर या दोघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांमधून परिसरात दहशत निर्माण करणे, लोकांच्या खासगी मालमत्तेस आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण करणे, हत्यारे बाळगून करुन दहशत निर्माण करणे, सततच्या चोरी करण्याच्या सवयीमुळे लोकांचे आर्थिक नुकसान होत होते. त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण होऊ नये, तसेच सराईत गुन्हेगारावर कायद्याचा जरब बसावा, म्हणून कोतवाली पोलिसांकडून हद्दपार करण्याबाबत शिफारस केली होती त्यावरून सुनावणी घेऊन श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग, अहमदनगर यांनी सदर गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्यातुन २ वर्षा करीता हद्दपारीचे आदेश पारित केले. सोमवारी (ता. २०) हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar Crime | नगर : त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर पोलिसांची धडक कारवाई…!