Mumbai News : मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खालापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी आत्महत्याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात कलम ३०६, ३४ अन्वये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ईसीएल फायनान्स कंपनी व एडलवाईस ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai News) कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
नितीन देसाई यांच्या कंपनीवर कर्ज होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये कंपनीने एडलवाईस एआरसीकडून १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये ईसीएल फायनान्सकडून पुन्हा अतिरिक्त ३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. (Mumbai News) जानेवारी २०२० पासून कर्जाचे हप्ते थकू लागले. त्यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यासाठी जुलै २०२२ मध्ये एनसीएलटीकडे याचिका दाखल करण्यात आली होती, असे एडलवाईस एआरसीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :