(MSRTC) पुणे : शहरात मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे शिवाजी नगर येथील एस टी बस आगार (MSRTC) तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येणार आहे. तसेच येथील वाहतूक सेवेत बदल करण्यात येणार असल्याचे राज्याचे मंत्री दादाभुसे यांनी सांगितले आहे.
राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. तसेच शिवाजीनगर येथील कामांसंदर्भात तसेच वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाबाबत आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उत्तर देताना भुसे यांनी ही माहिती दिली.
वाहतूक सेवेत बदल करण्यात येणार…
शिवाजीनगर येथील एसटीचे बसस्थानक मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे-मुंबई रस्त्यालगत वाकडेवाडी येथील शासकीय दुग्ध योजनेच्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील स्थानिक रहिवाशांसाठी वाकडेवाडी येथून डिसेंबर 2019 पासून बसस्थानक आणि आगार सुरळीत चालू असून जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस सुरू आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी जुने शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागी नवीन बसस्थानक तयार करण्यासाठी एसटी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात 3 फेब्रुवारी 2023ला बैठक झाली असून आता पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pimpari News : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पोलिस आयुक्तालयात आल्याने बसला धक्का
अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पीएमपीच्या प्रवाशांचे झाले हाल ; ठेकेदारांच्या अचानक संपाचा बसला फटका