अमरावती : राज्यसभेचे भाजप खासदार अनिल बोंडे यांची काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. ठाकूर यांनी इंग्रजांची चाकरी केली म्हणूनच त्यांना ठाकुरांची पदवी मिळाली, असं अनिल बोंडे म्हणाले. तसेच त्यांचा डीएनए हा इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा आहे, असं देखील ते म्हणाले.
खासदार अनिल बोंडे म्हणाले, इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकुरांची पदवी मिळाली. इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांपैकींचा यांचा डीएनए आहे. काँग्रेस पक्षाचा डीएनए महात्मा गांधीचा नाही, तर तो फिरोज जहांगीर गांधीचा आहे. भारतीय जनता पक्षाचा डीएनए हा भारताचा आहे, असं देखील बंडे म्हणाले.
दानधर्म केल्याने “ठाकुर” ही पदवी
आमदार यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडें यांना थेट भटांकडील इतिहास दाखवून प्रतिउत्तर दिले आहे.1700 मध्ये सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबांना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुर यांच्या कुटुंबाला “ठाकुर” ही पदवी दिल्याचा दावा यशोमती ठाकूर यांच्या घरी आलेल्या भटांनी केला आहे. दुष्काळात आमच्या पूर्वजांनी दान केले त्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत. माझ्या पूर्वजांनी गरीबांना मदत केल्याचा हा इतिहास आहे, देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.
हेही वाचा:
आप नेत्यांवर ईडीची कारवाई सुरूच, जवळच्या व्यक्तींच्या डायरीवरून अमानतुल्ला खान रडारवर
टीम इंडियाची चिंता वाढली: शुभमन गिल प्लेटलेट कॉउंट कमी झाल्याने रुग्णालयात दाखल