उरुळी कांचन, (पुणे) : परब्रम्ह परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी महाराज यांच्या पवित्र सेवा संबधाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोगरवाडी याठिकाणी मोटारसायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण मंदिर उरुळी कांचन यांच्याकडून सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांनी १६७६ मध्ये फलटण वरुन श्रीचक्रपाणी महाराज यांच्या विशेष सेवा संबधाने पवित्र झालेल्या श्रीरंगशिळा यांचा विशेष हत्ती वरुन मिरवणूक काढून श्रीक्षेत्र पोगरवाडी येथे स्थापना केली.
असा इतिहास आध्यात्मिक वारसा लाभलेल्या मंदिराच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आचार्य संत मंहत सदभक्त मोठ्या संख्येने येत असतात. त्या अनुषंगाने श्रीकृष्ण मंदिर सातारा महानुभाव आश्रम व चंदन – वंदन तपोभूमीचेही दर्शन घेण्यात आले.
यावेळी परमपूज्य सुबोधमुनी धाराशिवकर यांच्या संकल्पनेतून सदरची मोटारसायकल यात्रा यशस्वी व संपन्न भक्ती भावात संपन्न झाली. याप्रसंगी उत्तम चौधरी, विजय मुरकुटे, लाला कांचन, बापु कांचन, राजु कांचन, संजय कांचन, रामभाऊ कांचन, गोकुळ मुरकुटे, दत्तात्रय चौधरी, राजेंद्र घुले, संजय चौधरी, आबा मुरकुटे, सुदाम कांचन, राजु चौधरी, दादा म्हस्के, बाळु ढावारे आदी सदभक्तांनी या सेवेचा लाभ घेतला.