पुणे: मुलांचे भविष्य घडवण्यासाठी पालक मोठ्या आशेने त्यांना खासगी शिकवणी वर्गांत पाठवतात. मात्र, पुण्यात एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अत्यंत घृणास्पद प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मार्केट यार्ड भागातील एका प्रसिद्ध क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक शोषण केले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी विकास दिलीप गायकवाड या कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विकास गायकवाड हा संबंधित शिकवणी वर्गात कामाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून त्याने या निष्पाप विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात ओढले होते. तो केवळ विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून मुलांना ब्लॅकमेलही करत होता.

गेल्या काही दिवसांपासून तो मुलगा क्लासला जायचे म्हंटल कि घाबरत होता. पालकांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा त्याने सर्व काही सांगितले. पालकांनी वेळ न घालवता थेट पोलीस ठाणे गाठले. मार्केट यार्ड पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कठोर गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.







