यवत / राहुलकुमार अवचट (दौंड ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दौंड शहर व तालुक्याचे वतीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने दौंड शहरातील दुकान, संस्था व आस्थापनावरील पाट्या या मराठी मातृभाषेत असाव्यात याबाबतचे निवेदन दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले असून, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असून, सर्व दुकानदाराने करावे असे आवाहन देखील करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना दौंड शहर व तालुक्याचे वतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना पत्र देऊन ताबडतोब या संदर्भात कारवाई करावी. अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी मनसे दौंड तालुका अध्यक्ष सचिन कुलथे , दौंड शहर अध्यक्ष संदीप बोराडे, रस्ते स्थापना विभाग तालुका अध्यक्ष मंगेश साठी, दौंड तालुका उपाध्यक्ष अझर कुरेशी, मनसे महिला दौंड शहराध्यक्षा लता बगाडे, खडकी मनसे अध्यक्ष किरण शेगर, युवा कार्यकर्ता आदेश धिडरकर यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दौंड शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. for otherwise in MNS style