अजित जगताप
Satara Farm News : वडूज, (सातारा) : गेले दोन दिवस अचानक कोसळलेल्या पावसाने व गारपिटाने (losses due to sudden rain) खटाव तालुक्यातील अनेक गावांचे व शेतकऱ्यांचे (Many villages and farmers) मोठे नुकसान झालेले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खटाव चे जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी (Jayakumar Gore and District Collector Ruchesh Jayavanshi) व जिल्हा कृषी अध्यक्षा फरांदे यांनी स्वतः डांबेवाडी व कलेढोण गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या द्राक्ष (Grapes) शेतात जाऊन पाहणी केली. (nspected the farmers) satara fara news
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठाम आहे. प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन देण्यात आले. तसेच विम्या बाबत येत्या वीस दिवसात चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. असे स्पष्ट केले.
डांबेवाडी या गावातील शेतकरी विक्रम बागल, विशाल बागल, मधुकर बागल, हनुमंत बागल, दिनकर बागल, किरण कुलकर्णी ,तसेच कलेढोन येथील अशोक जाधव, कृष्णा शिंदे, उत्तम शिंदे आधी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून निर्यातीसाठी सज्ज झालेल्या द्राक्ष बागा अक्षरशा भुईसपाट झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडलेले आहे .
गावातील शेतकरी रामभाऊ बर्गे, दादासाहेब बर्गे, शितल बर्गे, रंजना बर्गे यांच्या गट नंबर ३९९ व ४०१ क मधील कांदा जमीनदोस्त झाला तर काढून ठेवण्यात आलेला कांदा पावसामुळे भिजून त्याचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी तमाम शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज भर उन्हात दुपारी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व भाजप जिल्हा अध्यक्ष व माण- खटाव चे आमदार जयकुमार गोरे, जिल्हा कृषी अधीक्षक सौ भाग्यश्री फरांदे, तलाठी शिल्पा गोरे आधी मान्यवरांनी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन नुकसान भरपाईच्या पाहणी केली.
या वेळेला झालेल्या नुकसानी बाबत ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळेल परंतु काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा बँकेने विमा उतरवला नसल्याची बाब उघडकीस आलेले आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून असे का घडले? असे कुणामुळे घडले? हा गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने चौकशी करून येत्या वीस दिवसात निर्णय घ्यावा असे स्पष्ट झाले आहे.
अचानक कोसळलेल्या पावसामुळे निर्यातीसाठी सज्ज झालेले द्राक्ष बाग उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर ती स्वतः कष्टाने उभारलेली द्राक्ष बाग पाहताना अनेकांना अश्रू अनावर झाले. देशी कांद्याचे तशीच अवस्था झाली असून त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी होऊ लागलेली आहे. कलेढोण या ठिकाणीही भेट देण्यात आले एक एकर द्राक्ष बागासाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च येत असून त्याची चांगल्या पद्धतीने निघा राखून व निर्यात झाल्यानंतर तिप्पट पैसे मिळतात. पण आता भांडवल सुद्धा मिळणे अशक्य झाले आहे.
या दौऱ्याच्या वेळी भाजप खटाव तालुकाध्यक्ष धंनजय चव्हाण, सागर अभंग, बाळासाहेब नलवडे, तांबेवाडी चे सरपंच किशोर बागल, माजी सरपंच कृष्णाराव बनसोडे, कल्पेश बागल तसेच रवींद्र काळे निलेश किरपे, विक्रम रोमन ,श्रीकांत बनसोडे, याचबरोबर गोपाळ बिडकर ,परदेशी कलेढोण सरपंच प्रीती शेटे, राजेंद्र कणसे विलास नायकुडे, पवन देशमुख, धनाजी माळी, महेश पाटील , पवन देशमुख, पोपट गारळे, सुरेश देशमुख विक्रम देशमुख आदी ग्रामस्थांनीही सहभागी होऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे गारांनी मांडली.
दरम्यान, काल व आज ही जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. खटाव तालुक्यातील डांबेवाडी, शिंगारवाडी यलमरवाडी बोंबाल, कलेढोण, मायणी आदी परिसरात अचानक दुपारी कोसळलेल्या पावसामुळे शेतकरी विक्रम दादासाहेब बागल पाटील, गुलाबराव बागल, मधुकर बागल किरण कुलकर्णी हनुमंत गुरव कृष्णात बागल विपुल बागल, वैभव बागल, तसेच शिंगाळवाडी येथील सचिन शिंगाडे यांचे नुकसान झाले होते. त्याचे नुकसान भरपाई पंचनामे वेगाने करावेत अशी सूचना करण्यात आली.
Satara News | वडूज नगरपंचायतीने वसुली विशेष मोहिमेतून केली दमदार कामगिरी
Satara News | नवीन रस्त्यात पडतात खड्डे तरी काही करतात नेत्याचे बर्थडे