Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Farmer News : चिया कडधान्यातून शेतकरी मालामाल ; महाराष्ट्रातील पहिलेच पीक…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 9 April 2023, 18:11

(Farmer News) कर्जत, (अहमदनगर) : मानवी आरोग्याला लाभदायक असणाऱ्या विविध घटकांच्या गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या चिया हे कडधान्य जास्तच भाव खाताना दिसत आहे. वाघा (ता. कर्जत जि.नगर) येथील महेंद्र बारसकर या शेतकऱ्याने चिया या कडधान्याचे बीज परदेशातून आणून आपल्या कोरडवाहू क्षेत्रात चिया हे नवखे पीक घेऊन लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे. महाराष्ट्रात हे पीक पहिल्यांदाच घेतल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे.

एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकाराने बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धान्य महोत्सवात विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल बरोबरच अन्नधान्य व विविध कडधान्यांचे स्टॉलही थटले गेले आहेत. या धान्य महोत्सवात नगर जिल्ह्यातील महेंद्र बारसकर या शेतकऱ्याने चिया नामक नवखे व अनोखे आरोग्यदायी कडधान्य विक्रीसाठी ठेवले असून ते सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

वजन कमी करणे, मधुमेहावर नियंत्रण ठेवणे, रक्तदाब, हाडे मजबूत होण्यासाठी उपयुक्त

चिया हे खरीप हंगामात येणारे पीक आहे. वजन कमी करणे, मधुमेहावर नियंत्रण ठेवणे, रक्तदाब, हाडे मजबूत होण्यासाठी उपयुक्त आदींसाठी चिया या कडधान्याचा उपयोग होतो. रात्री २ ते ३ ग्रॅम चिया हे कडधान्य पाण्यात भिजवत ठेवून ते सकाळी खाल्ले जाते. हे कडधान्य अमेरिकेत मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. शिवाय अमेरिकेत चिया हे श्रीमंतांचे अन्न म्हणूनही ओळखले जाते.

 

शेतकरी बारसकर यांची पुतणी वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया व अमेरिकेत गेली होती. त्यावेळी तिला चिया या कडधान्याची ओळख झाली. त्यानंतर तिने रशियातील दवई येथून थोटे बियाणे पाठवून दिले. त्यानंतर बारसकर यांनी चिया कडधान्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकची माहिती घेत त्यांनी या नवख्या पिकाची पेरणी केली. अवघ्या तीन महिन्यात कोरडवाहू जमिनीत कमी पाण्यात त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून एकरी तब्बल १० क्विंटल उत्पादन मिळवले आहे.

चिया या कडधान्याला प्रति किलो १ हजार रुपये भाव असून, बाजारात त्याला उठाव ही मोठ्या प्रमाणात आहे. अवघ्या ३ महिन्यात हे पीक काढणीला येते तिळाप्रमाणे त्याची झाडे असतात. अगदी कमी पाण्यात हे पीक येते. शेतकरी बारसकर हे मागील वर्षापासून चियाचे पीक घेत आहेत. या पिकासाठी रासायनिक खतांचा किंवा फवारणीची आवश्यकता भासत नाही शिवाय चियाला उग्र वास असल्याने कोणत्याही रोगाला हे पीक बळी पडत नाही.

चियाचे पीक घेतल्यावर सुरुवातीला मला लोक हसू लागले. उग्र वासामुळे जनावरे देखील या पिकाला तोंड लावत नाहीत. तुम्ही हे पीक घेतले तर विकत कोण घेणार.. असे प्रश्न विचारले जाऊ लागले मी दहावी नापास शेतकरी आहे.. त्यामुळे सुरुवातीला मलाही थोडी साशंकता होती. मात्र मागील वर्षी आलेले धान्य यशस्वीपणे विकले गेल्यावर सध्या मी ४ एकर क्षेत्रात चियाचे पीक घेतले आहे.. या पिकासाठी विशेष कष्ट न घेता शेतकरी ५ लाख रुपयापर्यंत नफा कमवू शकतो असे बारसकर यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Satara Farm News : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार गोरे व सातारा जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.