दिनेश सोनवणे
दौंड : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वर्गीय आर आर (आबा )पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेत दौंड तालुक्यातुन स्मार्ट ग्राम पुरस्कार मध्ये मिरवडी गावाची प्रथम क्रमांकाने तालुका स्मार्ट ग्राम (2021-22) निवड झाली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास विशेष विकास कामांसाठी 10 लाख रुपये पारितोषिक म्हणून मिळणार आहे. अशी माहिती गावचे सरपंच सागर शेलार यांनी दिली
सरपंच सागर शेलार म्हणाले, स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायत ची निवड केली आहे. प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायत ला १० लाख रुपयांचे बक्षिस मिळाले मिरवडी ग्रामपंचायत कडून गावातील मुख्य रस्ते, शाळा, सभा मंडप, चौक, समाज मंदिर,धार्मिक स्थळे, स्मशानभूमी या भागात वृक्षारोपण केली आहे. तसेच गावातील मुख्य नियोजन बद्द रस्ते आहे. जिल्हा परिषद शाळेतील संख्या लक्षणीय असून येथील शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच गावात निसर्गातील पक्षांन करिता,अन्न व पाण्याची सोय (पक्षी ज्युस बार) ही संकल्पना राबली असून या मुळे गावात विविध पक्षानं चा सहवास वाढला आहे.
जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना गावात (मूलभूत सुविधा) देण्यात ग्रामपंचायत कडून सर्वसी प्रयत्न केले गेले आहे. गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे. गावातली सर्व नागरिकांचे लसीकरण झाले आहे.या मुळे आम्ही या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवू शकलो. तसेच येणारा काळ हा तंत्रज्ञान चा असल्याने तसेच मिरवडी गावापासून पुणे, हडपसर ही महानगर जवळ असल्याने मिरवडी गावातील युवकांना करिता,आयटी सेक्टर , व्यवसाय मार्गदर्शन,व स्पर्धा परीक्षा बाबत विविध मार्गदर्शन ( सेमिनार) चे आयोजन ही केले होते.
दरम्यान, मिरवडी गावाची पाहणी बारामती आणि दौंड तालुक्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी 23 मे 2022 ला केली आहे. या योजनेत मिरवडी गावाने सहभागी होऊन अनेक विशेष व नाविन्यपूर्ण मुद्यांवर कौतुकास्पद कामगिरी पार पाडली आहे.