वाघोली, (पुणे) : वाघोली येथील एका क्रिकेट अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तिच्या क्रिकेट कोचकडून सातत्याने विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन येथील प्रशिक्षकाविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात (POCSO Act अंतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयदीप विठ्ठल खेत्रे (वय 29, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयदीप खेत्रे याची चोखी दानी रस्त्यावर स्पोर्टस् क्रिकेट अॅकॅडमी आहे. या अॅकॅडमीत अल्पवयीन मुलगी क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. जयदिप खेत्रे हा बॉलींग करण्याची ट्रनिंग देत असताना वारंवार स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने जयदीप खेत्रे याच्या विरोधात वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी खेत्रे याच्यावर या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 74, 75 आणि ‘लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 (POCSO Act) अंतर्गत कलम 8, 10, 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.