Manoj Jarange Patil : सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम देऊनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
आत्महत्या न करण्याचे देखील आवाहन
अखेर पुन्हा जरांगे पाटील यांनी मैदानात उतरत मराठा उद्यापासूनच राज्यातील गावागावातील मराठा समाज आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी आत्महत्या न करण्याचे देखील आवाहन केले आहे.
सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे, असा इशारा हि सरकारला दिला आहे, मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या. उग्र आंदोलन करू नका, शांततेत आंदोलन करू, उद्या २९ तारखेपासून आमरण उपोषण सुरू करा, कुणाच्या जीवाला काही झालं तर त्याची जबाबदारी राज्य सरकारचीच राहील, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनीच उपोषण करा. संपूर्ण गावच्या गावं उपोषणाला बसा. उपोषणात सर्व गावं सहभागी झाल्यास सरकारवर दबाव होतो का? सरकार आपल्याकडे गांभीर्याने बघतं का? हे दिसून येईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आपल्या गावात, दारात कोणत्याही नेत्यांना येऊ द्यायचं नाही. आपणही कोणत्याही नेत्याच्या दारात जायचं नाही. कुणाच्या जीवितास धोका झाला तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची राहील. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 31 पासून तारखेपर्यंत सुरू होईल. त्याची माहिती 30 तारखेला देऊ. तिसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण प्रत्येक गावात सुरू होईल. हजारोच्या संख्यने लोकं आमरण उपोषणाला बसणार आहेत. देशातील आणि राज्यातील हे पहिलं सामूहिक आमरण उपोषण असेल. उपोषण शांततेत करा. सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं,” असे आवाहन देखील त्यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली
दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. “माझ्या पोटात चार दिवसांपासून पाणीही नाही. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला आहे. मला त्रास होतो आहे. मात्र त्यापेक्षा मराठा समाजाला होणारा त्रास खूप मोठा आहे. माझ्या त्रासापेक्षा माझ्या समाजाचा, पोरांचा त्रास जास्त आहे. माझ्या समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी मी उपोषणाला बसलो आहे, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आरक्षण मिळणार आहे मात्र कुणी आत्महत्या करू नये”,असेही जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे.