पुणे : दिवाळीत उटण्याने अभ्यंग स्नान करण्याला खूप महत्व आहे. लहान मुल असो वा मोठे उटण्याने अभ्यंग स्नान केल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही. दिवाळीत प्रत्येक घरात उटणे वापरले जाते.पण हे उटणे लहान मुलांसाठी नेहमीसाठी देखील उपयुक्त आहे.
लहान मूल घरी आले की अनेकदा मोठी माणसे वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात. यापैकी एक म्हणजे उटण्याबद्दल आहे. मुलासाठी जसा मसाज आवश्यक आहे, तसच उटणे देखील आहे. उटणे फक्त बाळाला गोरं बनवते असे नाही तर केस काढण्यासाठी देखील उपयुक्त आहे. लहान मुलांच्या चेहऱ्यावर आणि हात-पायांवर भरपूर केस असतात, अशावेळी ते काढण्यासाठी ते घासले जातात. याशिवाय उटण्याचा उपयोग मुलांच्या शरीराचा रंग उजळण्यासाठी देखील करता येतो. घरगूतू उटणे कसे बनवायचे हे जाणून घ्या
उटणे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे…
– मलई
– दूध
– मैदा
– बेसन
– मध
– हळद
– मोहरी तेल
उटणे कसे बनवायचे
ते तयार करण्यासाठी प्रथम कोरड्या गोष्टी मिक्स करा आणि नंतर त्यात मध घाला. आता थोडे थोडे दूध घाला. मिश्रण खूप घट्ट किंवा खूप सैल होणार नाही याची काळजी घ्या. दूध घालताना मलई किंवा साय घाला. शेवटी मोहरीचे तेल घाला. हे मिश्रण हाताने मिक्स करून चांगली घट्ट पेस्ट बनवा. तुमचे उटणे तयार आहे.
कसे लावावे उटणे
स्त्रिया देखील हे उटणे वापरु शकता. जर तुम्हाला उटण्याचे चांगले रिझल्ट हवे असतील तर हे उटणे दररोज बाळाला लावा.मुलाला उटणे लावण्याआधी त्याच्या शरीराची चांगली मालिश करा आणि नंतर आपल्या हातात थोडेसे उटणे घ्या. ते रोल ऑन केल्याप्रमाणे केसांच्या दुसऱ्या बाजूला घ्या. चेहऱ्यावर देखील मुलाच्या केसांची दुसरी बाजूने करा तर कपाळावर उजवीकडे आणि डाव्या बाजूला करा. मुलांची त्वचा अतिशय नाजूक असते, म्हणून तुम्ही ती चोळण्यापूर्वी थोड्या प्रमाणात तपासू शकता. कोणतीही समस्या नसल्यानंतरच ते संपूर्ण शरीरावर लावा.