Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज,प्रकृती स्थिर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 November 2026, 10:37

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते बारामतीला न जाता थेट मुंबईतील आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाण्यासाठी निघाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफ आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्यामुळे तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या अचानक उद्भवलेल्या अस्वास्थ्यामुळे त्यांचा नियोजित दुष्काळ पाहणी दौरा आणि इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावे लागले होते. डॉक्टरांनी त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या आणि योग्य ते उपचार दिले. आता त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि सुधारलेली आहे.

रुग्णालयातून बाहेर पडताना शरद पवार हे व्हीलचेअरवर बसलेले दिसले. त्यांनी बाहेर उपस्थित असलेल्या आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केले. त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मुंबईला निघण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे हात जोडून मनापासून आभार मानले.शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली होती.

वैद्यकीय तज्ज्ञांनी पवारांना पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार ते मुंबईतील घरी सुमारे आठ दिवस आराम करतील. या विश्रांतीनंतर, म्हणजेच दिवाळीचा सण संपल्यावर, ते पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू करणार असल्याचे समजते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! आठ सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Thursday, 5 November 2026, 21:56

बारामती शासकीय रुग्णालयात ६ व्या मजल्यावरून पडून रुग्णाचा करुण अंत! वॉर्डच्या खिडकीतून बाहेर पडताना तोल गेला अन्…

Thursday, 5 November 2026, 21:06

पुण्यात दोन दुचाकींच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सीसीटीव्हीच्या आधारे १८ वर्षीय दुचाकीस्वारावर गुन्हा

Thursday, 5 November 2026, 20:30

“आरोपींना सोडणार नाही, केस फास्ट ट्रॅकवर चालवणार!” एकनाथ शिंदेंचा पायलच्या कुटुंबियांना फोन; नेमकं काय म्हणाले?

Thursday, 5 November 2026, 19:49

अटकेची २४ तासांची मुदत प्रत्यक्ष ताब्यापासूनच!

Thursday, 5 November 2026, 19:12

शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाचे कारनामे! शासकीय इमारतीसाठी नैसर्गिक ओढाच बुजवला?

Thursday, 5 November 2026, 18:24
Next Post

PM किसानचे 2,000 रुपये आले नाहीत? PM किसानचा 24 वा हप्ता अडकला असेल तर लगेच करा 'हे' काम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp