Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“आरोपींना सोडणार नाही, केस फास्ट ट्रॅकवर चालवणार!” एकनाथ शिंदेंचा पायलच्या कुटुंबियांना फोन; नेमकं काय म्हणाले?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 November 2026, 19:49

मुंबई : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या कथित मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पायल झांबरे हिने आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, पायलच्या आईसह काका-काकूंशी फोनवरून संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. पायलला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आश्वासनही त्यांनी कुटुंबीयांना दिले.

फोनवरून संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी पायलच्या कुटुंबीयांना काळजी करू नका, असा दिलासा दिला. पायलसोबत घडलेली घटना दुर्दैवी असून, या प्रकरणाचा शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

“पायलला न्याय मिळवून देऊ. शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी आहे. या प्रकरणात मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार आहे. कोणालाही सोडणार नाही,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांना दिला.

तसेच हे प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पायल झांबरे हिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या कथित मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पायलचा पती, सासू आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पायलच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.

तर पायलची नणंद अक्षता झांबरे-निम्हण हिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तिला अटक झालेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महिलांचा छळ करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि अशा घटनांना आळा बसावा, यासाठी दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच कुटुंबीयांना न्यायालयीन लढाईत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी योग्य वकिलांची नियुक्ती करण्यापासून ते संपूर्ण खटल्याच्या प्रक्रियेपर्यंत शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामती शासकीय रुग्णालयात ६ व्या मजल्यावरून पडून रुग्णाचा करुण अंत! वॉर्डच्या खिडकीतून बाहेर पडताना तोल गेला अन्…

Thursday, 5 November 2026, 21:06

पुण्यात दोन दुचाकींच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सीसीटीव्हीच्या आधारे १८ वर्षीय दुचाकीस्वारावर गुन्हा

Thursday, 5 November 2026, 20:30

“आरोपींना सोडणार नाही, केस फास्ट ट्रॅकवर चालवणार!” एकनाथ शिंदेंचा पायलच्या कुटुंबियांना फोन; नेमकं काय म्हणाले?

Thursday, 5 November 2026, 19:49

अटकेची २४ तासांची मुदत प्रत्यक्ष ताब्यापासूनच!

Thursday, 5 November 2026, 19:12

शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाचे कारनामे! शासकीय इमारतीसाठी नैसर्गिक ओढाच बुजवला?

Thursday, 5 November 2026, 18:24

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनसची घोषणा, परिवहन मंत्र्यांनी दिली मोठी भेट

Thursday, 5 November 2026, 18:23
Next Post

पुण्यात दोन दुचाकींच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सीसीटीव्हीच्या आधारे १८ वर्षीय दुचाकीस्वारावर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp