पुणे : शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आठ जणांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५५ आणि ५६ अन्वये ३ नोव्हेंबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, गंभीर मारहाण, विनयभंग, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अमली पदार्थांची विक्री, धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान, दहशत निर्माण करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे अशा विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
परिमंडळ दोन अंतर्गत भारती विद्यापीठ, पर्वती आणि स्वारगेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आठ जणांवर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

१. संकेत गोरख चोरगे (वय २४) – रा. साई सिद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार, पुणे.

२. आकाश ऊर्फ बंटी विलास पवार (वय २६) – सध्या रा. शनिनगर, हनुमाननगर, आंबेगाव खुर्द, पुणे. मूळ रा. जनता वसाहत, पर्वती.
३. वैभव युवराज डोळसे (वय २३) – रा. जनता वसाहत, पर्वती, पुणे.
४. सौरभ राजेश साठे (वय २०) – रा. अनंतकृपा सोसायटी, दत्तवाडी, पुणे.
५. निखील ज्ञानोबा लगाडे (वय २२) – रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी, पुणे. (टोळीप्रमुख)
६. विष्णू लक्ष्मण होसमनी (वय २१) – रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे. (टोळी सदस्य)






