Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात संजय गायकवाडांना मोठा दिलासा; नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 September 2026, 10:29

मुंबई : महिलांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अडचणीत आलेले बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणीपर्यंत गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांना चार्जशीट (दोषारोपपत्र) प्रविष्ट करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच राज्य सरकारला याप्रकरणी 21 ऑक्टोबर पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर नृत्य केले होते. यावर भाष्य करताना संजय गायकवाड यांनी महिलांच्या शारीरिक क्षमतेबाबत अयोग्य टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या सविता बेंडवाल यांनी 12 सप्टेंबर रोजी बुलढाणा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवला होता.

गुन्हा रद्द करण्यासाठी गायकवाड यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. कोर्टात त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले की, ही तक्रार मूळ घटनेच्या 6 दिवसांनंतर दाखल करण्यात आली असून त्यामागे राजकीय हेतू आहे. तक्रारदार महिलेचा या घटनेशी थेट संबंध नसून केवळ राजकीय दबावापोटी ही कारवाई करण्यात आली असल्याचा दावाही करण्यात आला. न्यायालयीन बाबींचा विचार करून उच्च न्यायालयाने गायकवाड यांच्यावरील पुढील पोलीस कारवाईला तात्पुरती बंदी घातली आहे.

 

आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे आणि वादांमुळे आमदार गायकवाड नेहमीच चर्चेत राहतात. मंत्रालयातील उपहारगृहातील कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण असो किंवा पुस्तकाच्या लेखकासोबत झालेला वाद असो, त्यांचे नाव सातत्याने समोर आले आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यात भाजप आमदार श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पेटला असून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये टशन; डीजेचा दणदणाट, लेजर लाईटचा मारा अन् ट्रॅक्टरवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, कारवाई कधी?

Friday, 25 September 2026, 12:23

सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी! अनंत चतुर्दशीला 24, 22, 18 कॅरेटचे भाव वाढले,पाहा आजचे भाव…

Friday, 25 September 2026, 12:07

यशवंत बचाव कृती समितीच्या आरोपांना रविवारी सभेत पुराव्यांसह उत्तर देणार; अध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा

Friday, 25 September 2026, 11:13

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, हायकोर्टात याचिका

Friday, 25 September 2026, 11:09

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा GR जारी; खात्यात 1,500 की 3,000? नेमकं काय ठरलं?

Friday, 25 September 2026, 10:47

गणेश विसर्जनासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज ; 6कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था अन् 8 नियंत्रण अधिकारी, 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Friday, 25 September 2026, 10:14
Next Post

शिरसवडीत दरवाजा उघडा दिसला अन् चोर घरात शिरला! महिलांचे सोन्याचे दागिने चोरले, आरडाओरड करताच झाला पसार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp