लहू चव्हाण
Mahabaleshwar News : पाचगणी : संततधार पडणाऱ्या पावसामुळे दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील श्री केदारेश्वर मंदिर ते श्रीपती निवास हा रस्ता खचल्याने या मार्गावरील दळणवळण ठप्प झाले आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरांना धोका निर्माण झाला आहे.(Mahabaleshwar News)
श्री केदारेश्वर मंदिरकडून श्रीपती निवास मार्गे मुख्य मार्गाकडे जाणारा रस्ता अचानक खचल्याने रस्त्याच्या बरच्या बाजूला असणाऱ्या नागरिकांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे दळणवळण ठप्प झाले आहे.(Mahabaleshwar News)
या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी उपसरपंच जनार्दन कळंबे, माजी सरपंच शंकरराव कळंबे, राजेंद्र कळंबे, शरद कळंबे, अमोल शांताराम कळंबे, अशोक कासूर्डे, राजू खरात, संजीव कळंबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राजेंद्रशेठ राजपुरे म्हणाले कि, रस्त्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या घरांना कसलाही धोका पोहोचू नये. यासाठी तातडीने हे काम सुरू करणार असून यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल.(Mahabaleshwar News)
दरम्यान, या रस्त्याची महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी खोचर – पाटील, पाचगणीचे तलाठी लिपीक पाटील यांनी सदर घटनेची पाहणी करून ग्रामपंचायत प्रशासनाला धोका असणाऱ्या आजूबाजूच्या घरातील लोकांना नोटीस देवून स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या आहेत.(Mahabaleshwar News)