LPG Cylinder : नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकार जनतेसाठी सातत्यानं विविध योजना राबवत असते. या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. त्यातच आता उत्तर प्रदेश सरकारने दिवाळीपूर्वी राज्यातील नागरिकांना एक अनोखी भेट दिली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात दोन मोफत सिलिंडर देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे.
असा करावा अर्ज : मोफत 2 सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी प्रथम एक अर्ज करावा लागणार आहे. popbox.co.in/pmujjwalayojana वर जा. यानंतर एक फॉर्म डाऊनलोड करा. सर्व तपशील त्यामध्ये भरा. त्यानंतर जवळच्या गॅस एजन्सीमध्ये फॉर्म सबमिट करा.कागदपत्र पडताळणीचे काम होईल. त्यानंतर तुम्हाला उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन कनेक्शन दिले जाईल.
1.75 कोटी कुटुंबांना मोफत 2 सिलिंडर : दिवाळीपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने महिलांना एक अप्रतिम भेट दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोफत गॅस देण्याच्या निर्णयावर सहमती झाली आहे. त्यामुळं आता राज्यातील 1.75 कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने दिवाळी आणि होळीच्या मुहूर्तावर महिलांना मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी दिवाळीपूर्वी 2 मोफत एलपीजी सिलिंडर मिळणार असल्याचे सांगितले आहे. सिलिंडर देण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात 3301.74 कोटी रुपयांची तरतूद होती. केंद्र सरकार 300 रुपये अनुदान देणार आहे.