Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikand News : तुळापूरमध्ये कोर्टाचा निकाल बाजूने लागूनही ताबा मिळवण्यासाठी बळजबरी ; 10 -12 जणांच्या टोळीकडून शेतातील झाडे तोडून पाईपलाईनचे केले नुकसान..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 10 May 2026, 11:45

Lonikand News : लोणीकंद (पुणे) : कोर्टाचा निकाल बाजूने लागलेला असतानाही, बळजबरीने जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी शेतकरी कुटुंबाला धमकावून त्यांच्या शेतात घुसखोरी केल्याची धक्कादायक प्रकार तुळापुर (ता. हवेली) हद्दीत उघडकीस आली आहे. तसेच 10 ते 12 साथीदारांनी महिलांना शिवीगाळ करत शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. Lonikand News

अनिता सिताराम शिवले, (वय 42, व्यवसाय शेती, रा. शिवले वस्ती, मु.पो. तुळापुर. ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संजय प्रभाकर चव्हाण (रा. तुळापूर, ता. हवेली) व 10 ते 12 अनोळखी पुरुष आणि महिलांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Lonikand News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता शिवले त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या स्वतः शेती करून मुलाचा उदरनिर्वाह करतात. 2017 पासून त्यांचा सोमनाथ कदम यांच्यासोबत जमिनीचा कायदेशीर वाद सुरू होता. 2025 मध्ये या जमिनीचा निकाल अनिता शिवले यांच्या बाजूने लागला. मात्र, तुळापूरच्या तलाठ्यांनी कोर्टाच्या निकालानुसार अद्याप सातबारा उताऱ्यावर अनिता यांचे नाव नोंदवले नव्हते. Lonikand News

 

शुक्रवारी (ता. 08) सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अनिता शिवले यांच्या सासू आणि जाऊ शेतात काम करत असताना, संजय प्रभाकर चव्हाण हा 10 ते 12 अनोळखी पुरुष आणि महिलांसह शेतात घुसला. तेथे या टोळीने शेतात बेकायदेशीरपणे ‘लष्कर-ए-भीमा’ संस्थेच्या मजकुराचा बोर्ड लावला. अनिता शिवले यांच्या सासूने विचारणा केली असता, “ही जागा आता माझी आहे, तुम्ही बाहेर व्हा,” असे म्हणत आरोपींनी धमकावले. Lonikand News

बाचाबाची वाढल्यानंतर आरोपींसोबत आलेल्या महिलांनी रागाच्या भरात शेतातील पाण्याचे पाईप उपटून फेकून दिले. तसेच शेतात लावलेली नारळाची झाडे आणि टोमॅटोच्या पिकांची तोडफोड करून नुकसान केले. “या जमिनीतून बाहेर व्हा, नाहीतर बघून घेईल,” अशी धमकी देत संजय चव्हाण याने शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Lonikand News

दरम्यान, या प्रकरणी अनिता शिवले यांनी पोलिसांत धाव घेऊन कायदेशीर तक्रार दिली आहे. कोर्टाचा निकाल बाजूने असतानाही अशा प्रकारे बळजबरीने घुसखोरी आणि तोडफोड झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, बळजबरीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी शिवले कुटुंबाने केली आहे. Lonikand News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Pune Mocca News : मोक्का गुन्ह्यातील ८ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद ; पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.