लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती येथील एका तरुणाचा ४५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष होले व श्रीनाथ जाधव यांनी मिळवून दिला आहे. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित तरुणाने पोलिसांचे आभार मानले.
उत्तम भोसले (वय-२६, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) हा तरुण शनिवारी मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी संतोष होले यांनी सदर मोबाईलची माहिती हि तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतली. व त्या महितीच्या आधारे त्या मोबाईलचे लोकेशन मिळवले. त्यानुसार त्या मोबाईलचे लोकेशन हे डी. एस. के. या ठिकाणी दिसून आले.
दरम्यान, तात्काळ संतोष होले व श्रीनाथ जाधव यांनी अंधारात लोकेशनच्या ठिकाणी जाऊन सदर फोन वर संपर्क केला असता तो गवतात चमकताना दिसून आला. सदर मोबाईल हा भोसले याला जबाब घेऊन परत दिला आहे.