Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर ; न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने निर्णय, तर फैसला उद्या मंगळवारी होण्याची शक्यता?…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 August 2022, 12:10

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आपापल्या आमदारांची आमदारकी वाचवण्यासाठी लढत आहेत. या प्रकरणाची सुनावणी काल सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार होती. मात्र न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. आता ही सुनावणी मंगळवारी (२३ ऑगस्ट) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना कोणाची आणि शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार का, याच्या निकालासाठी आणखी एका दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सातत्याने लांबणीवर टाकली जात आहे. या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यादरम्यान शिंदे गट शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा शिवसेनेने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याबद्दलच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती मिळवून घेतली होती.

उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगाने दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. ती मुदतही २३ ऑगस्टलाच संपत आहे. याप्रकरणाची सुनावणी वारंवार लांबवणीर पडत असल्याने अनेक चर्चांना उधाण झाले आहे. निष्पक्ष न्यायाचा आग्रह धरणाऱ्या आणि परखड मतं व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांमध्ये संपत आहे.

त्यानंतर यू.यू. लळीत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतील. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे गेल्यास निकाल लागण्यास खूपच विलंब लागू शकतो. याकाळात शिवसेनेची पूर्णपणे वाताहात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरी शिवसेना कोणाची? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांनी दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे गेल्या ११ जुलैपासून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.

 

दरम्यान, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा विचार न्या. रमणा यांनी व्यक्त केला आहे; मात्र अजून घटनापीठाची स्थापना झालेली नाही. यादरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास शिवसेनेसमोर मोठे संकट उभे राहू शकते. आता प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (२३ ऑगस्ट) होण्याची शक्यता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

लोणी काळभोर पोलिसांनी मिळवून दिला हरवलेला ४५ हजार रुपयांचा मोबाईल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp