लोणी काळभोर : देशी विदेशी मद्याची अनधिकृत वाहतूक करणारी एक संशयित कार लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर (ता. हवेली) परिसरात सोमवारी (ता. 30) दुपारच्या सुमारास पकडली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी कारसह मद्याचा साठा ताब्यात घेतला आहे. मद्यानी भरलेली कार सोडावी म्हणून अनेक राजकीय नेत्यांसह प्रतिष्टीत नागरिकांचे पोलिसांना फोन आले आहेत.
मात्र, पोलिसांनी दारूची बिले दाखविल्याशिवाय कार सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. तर या पकडलेल्या मद्याचा पुरवठा एका बारला 31 डिसेंबरसाठी होणार होता. तसेच यामध्ये नायगाव मधील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, राजकीय नेत्यांनी मद्याने भरलेली कार सोडून देण्यासाठी पोलिसांवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही अनधिकृत मद्याची वाहतूक असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा कागदपत्रे व पुरावे तपासून सोडून द्यावी. अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली.