लोणी काळभोर : पुणे येथील हार्बर सोसायटी या संस्थेकडून लोणी काळभोर, उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात वाहतूक सुरक्षा जनजागृती मोहीम शनिवारी (ता.१९) राबविण्यात आली आहे.
नेशन चेंज मेकर मोहिमेची सुरवात पुणे-सोलापूर महामार्गावरील MIT कॉर्नर चौकात शुक्रवारी (ता.१८) करण्यात आली आहे. संस्थेचे प्रतिनिधी डॉ. अविनाश वाघमारे, कल्पेश लोहार, अजय गावडे, रॉबिन फ्रान्सिस व संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास रस्ते अपघात बर्याच प्रमाणात टाळता येऊ शकतात. वाहन चालवताना किंवा बाइक चालवताना, सीट बेल्ट आणि हेल्मेट घालणे यासारख्या सुरक्षा खबरदारी वापरा. वाहन चालवताना सौंदर्य प्रसाधने, केस घालणे किंवा फोनवर बोलणे या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत. नेहमी रस्त्याचे नियम पाळा. असे फलक दाखवून संस्थेच्या प्रतिनिधींनी जनजागृती केली.
दरम्यान, पुणे शहरातील वाढती वाहतूक, होणारी गर्दी व नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेता. वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. परिणामी जीवघेणा अपघात, ट्रॅफिक जॅम व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची जाणीव पूर्वक दखल घेत हार्बर सोसायटी संस्थे तर्फे स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्ट) नेशन चेंज मेकर ही वाहतूक सुरक्षा जनजागृती मोहीम सुरू केली आहे. हि मोहीम संपूर्ण पुणे शहर तसेच लगतच्या संपूर्ण परिसरात महिनाभर राबविण्यात येणार आहे.