लोणी काळभोर : शॉर्टसर्किटमुळे एका केकच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात असलेल्या राजेंद्र पेट्रोल पंपासमोर शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
संकेत तानाजी जाधव (वय 27, रा. लोणी काळभोर तालुका हवेली) असे नुकसान झालेल्या दुकान चालकाचे नाव आहे. जाधव यांचे माळी मळा परिसरात डब्ल्यू एस बेकर्स या नावाने केकचे दुकान आहे. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुकानात अचानक शॉर्टसर्किट झाले. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे दुकानाला आग लागली होती. नागरिकांनी अग्निबंबाचा मारा करून आग विझविली.
दरम्यान, या आगीत दुकानातील फर्निचर केक वायरिंग व पीओपी जळून खाक झाली आहे. यामुळे जाधव यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तर सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.