नागपूर,: नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात नीरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेत पदभरती होत आहे. कनिष्ठ सचिवालाय सहाय्यक व कनिष्ठ स्टेनोग्राफर अशी पदे आहेत. त्यासाठी बारावी उत्तीर्ण ही पात्रता ठेवण्यात आली आहे. यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.
. पर्यावरण संस्थेत निघालेल्या भरतीच्या या जागा तीन वेगवेगळ्या विभागात भरल्या जाणार आहेत. या दोन्ही पदांसाठी अर्ज इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण केली असावी.या शिवाय संगणकावर टायपिंगची गती चांगली असणे महत्वाचे आहे . उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व संगणक टायपिंग स्पीड टेस्ट या आधारे केली जाणार आहे. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक सहाय्यक पदासाठी उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल वय मर्यादा २८ वर्ष आहे. तर कनिष्ठ स्टेनोग्राफर पदासाठी १८ ते २७ अशी ठेवण्यात आली आहे.
दरम्यान या सरकारी नोकरीसाठी लेखी परीक्षा ओएमआर आधारित राहणार. या पद्धतीत २०० प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी अडीच तासांचा आहे. पेपर एक हा मानसिक क्षमता चाचणीचा असणार. तर पेपर दोन हा सामान्य ज्ञान व इंग्रजी भाषेचा राहील. ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट पदासाठी १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये अशी वेतनश्रेणी लागू राहील आणि ज्युनिअर स्टेनोग्राफर या पदासाठी २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये ही वेतनश्रेणी मिळणार. या पद भरती अनुषंगाने इतर सर्व तपशील सीएसआयआर निरीच्या अधिकृत वेबसाईटवर तपासता येणार आहे.