Leopard news : उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ व परिसरामध्ये बिबट्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून, पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. शुक्रवारी (ता. 29) पहाटेच्या सुमारास भिडे वस्ती – कड वस्ती परिसरात एका शेतकऱ्याच्या घरासमोरून बिबट्याने वासरू उचलून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली असून, वनखात्याच्या संथ आणि ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांमधून संतापाचा उद्रेक होत आहे. Leopard news

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव मूळ येथील भिडे वस्ती – कड वस्ती परिसरातील रहिवासी चिंतामणी उर्फ बाबा भिडे यांच्या घरासमोर पाळीव जनावरे बांधलेली होती. शुक्रवारी पहाटे पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत भिडे यांचे वासरू जबड्यात पकडून ओढत नेले. बिबट्या त्या वासराला जवळच्याच शेतात घेऊन गेल्याची दाट शक्यता आहे. Leopard news

या घटनेचे गांभीर्य ओळखून कोरेगाव मूळच्या पोलीस पाटील वर्षा कड यांनी सर्व ग्रामस्थांसाठी तातडीचा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. बिबट्याने वासरू शेतात नेऊन फस्त केले असण्याची शक्यता असल्याने, तो याच परिसरात रेंगाळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जवळच्या शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी पुढील दोन दिवस शेतात जाणे टाळावे. Leopard news
“वनखाते फक्त चौकशी अन् पंचनामाच करणार का?”
या परिसरात बिबट्याचा हा पहिलाच हल्ला नाही. यापूर्वी बिबट्याने वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या तब्बल 3 कालवडी मारून फस्त केल्या आहेत. प्रत्येक वेळी घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी केवळ चौकशी करतात, घटनास्थळी येऊन पंचनामा करतात आणि निघून जातात, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. Leopard news
“वनखाते फक्त पंचनामे करण्यासाठीच आहे का? बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा का लावला जात नाही? एखादा मानवी बळी गेल्यावर वनविभागाला जाग येणार का? असेच दिवसेंदिवस चालू राहणार का?” असा संतप्त सवाल आता कोरेगाव मूळ आणि उरुळी कांचन परिसरातील शेतकरी विचारू लागले आहेत. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. Leopard news
याबाबत बोलताना कोरेगाव मूळचे माजी उपसरपंच लोकेश कानकाटे म्हणाले, “वन खात्याला वेळोवेळी माहिती देऊनही फक्त अधिकारी वर्ग स्थळ पाहणी करून जात आहे. पिंजरा लावण्याची वेळोवेळी मागणी केलेली आहे तरीही अद्यापपर्यंत पिंजरा लावण्यात आलेला नाही. Leopard news







