Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Census 2027 : जनगणना २०२७ च्या कामकाजाला शिक्षकांचा नकार ; लोणी काळभोरमध्ये पाच शिक्षकांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 29 May 2026, 11:36
Loni kalbhor

photo- social media

Census 2027 : लोणी काळभोर,(पुणे) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जनगणना २०२७ मोहिमेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील पाच शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तहसील प्रशासनाने आदेश देऊनही संबंधित शिक्षक जनगणना कामासाठी हजर न राहिल्याने अखेर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. Census 2027

शिल्पा राजाभाऊ येरमाळकर, सुनिल दिलीप शेळके, शिवाजी संभाजी गायाकवाड, प्रदीप बबन पारधी आणि शन्नो जॉक्सन गगादे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल नवनाथ गव्हाणे (वय ४१, रा. रायकर मळा, धायरी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Census 2027

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर तहसील हद्दीत जनगणना २०२७ चा कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कामासाठी संबंधित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मा. चार्ज ऑफिसर तथा तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी शासनाच्या पोर्टलद्वारे तसेच पर्यवेक्षक अधिकाऱ्यांमार्फत संबंधितांना आदेश कळवले होते. मात्र, आदेश मिळूनही संबंधित शिक्षकांनी जनगणना कामकाजासाठी हजर राहण्यास टाळाटाळ केली आणि काम करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. Census 2027

 

प्रशासनाच्या मते, जनगणना प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशानेच संबंधित शिक्षकांनी आदेश धाब्यावर बसवले. त्यामुळे अखेर ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने पाचही शिक्षकांविरोधात जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत. Census 2027

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59

शिक्षकांच्या कामाचा आढावा आता डिजिटल पद्धतीने! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, जिल्हानिहाय ‘विषय समित्या’ होणार स्थापन

Saturday, 25 July 2026, 8:47

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मंजुरी! लवकरच सुरू होणार सेवा

Saturday, 25 July 2026, 8:32
Next Post
weather update

Monsoon Update : महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस ; पावसाळ्यातही उष्णतेच्या झळा वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.