सागर जगदाळे
भिगवण : “मुळ कायदा म्हणजे काय आहे हे जनसामान्यांना समजावे ह्या दृष्टीकोनातुन स्पष्टीकरण देऊन कायद्याचे ज्ञान सर्व सामान्यांना व्हावे, तसेच न्यायालयामध्ये न येता गावपातळीवर वाद मिटवावेत, त्यामुळे कायदा हा ढालीसारखा वापरावा तलवारीसारखा वापरू नये असे प्रतिपादन न्यायाधीश स्वानंदी वडगावकर यांनी केले.”
भादलवाडी (ता. भिगवण) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर नालसा पॅन इंडिया-महाराष्ट्र राज्य विधी समिती, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण, इंदापूर तालुक्यातील विधी सहाय्यक समिती व इंदापूर बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमानाने विधी मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्वानंदी वडगावकर या बोलत होत्या. सदर कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी इंदापूर न्यायालयाचे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश के. सी. कलाल, न्यायाधीश श्रीमती शितल साळुंखे, न्यायाधीश श्रीमती ज्योती खटावकर, विधी मार्गदर्शन शिबीर प्रसंगी इंदापूर बार असोशिएशन मधील जेष्ठ विधिज्ञ अॅड. डी. एस. पाटील, अॅड. पी. एस. वाघमोडे, अॅड. के. डी. यादव, अॅड. बी. आर. चव्हाण, अॅड. एन. आर. कदम, अॅड. दादा गिरंजे, अॅड. विशाल मल्लाव, अॅड. अश्पाक सय्यद, अॅड.राहुल जाधव, अॅड. समीरन पोळ, अॅड. स्वप्नील जगताप, अॅड.संदिप बांदल, अॅड.प्रज्योत शिंदे, अॅड. अक्रम शेख, अॅड. समीरन पोळ, अॅड. लोहकरे, व न्यायालयीन कर्मचारी संतोष गायकवाड, म्हस्के व भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.
यापुढे बोलताना स्वानंदी वडगावकर म्हणाल्या, “आपआपसामध्ये तडजोड केली तर वादी व प्रतिवादी हया दोन्ही पक्षकारांचा विजय होतो हार कोणाचीही होत नाही.” याप्रसंगी इंदापूर न्यायालयाचे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश के.सी. कलाल, न्यायाधीश श्रीमती शितल साळुंखे, न्यायाधीश श्रीमती ज्योती खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उपस्थित न्यायाधीश स्वानंदी वडगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, या शिबीरामध्ये अॅड. एन. जी. शहा यांनी “शेत जमीन मोजणी संदर्भातील कायदे “याविषयी मार्गदर्शन केले, अॅड. राकेश शुक्ला यांनी ‘शेतीविषयक कायदे’ यावरती मार्गदर्शन केले. अॅड. सचिन चौधरी यांनी ‘महिलांचे विषयी कायदे व त्यांचे हक्क’ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच अॅड. शाम शिंदे यांनी ‘रजिस्टर पध्दतीने जमीनीची खरेदी विक्री करताना घ्यावयाची काळजी या विषयावरती मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. मधुकर ताटे यांनी सुत्रसंचालन अॅड.माधव शितोळे यांनी केले तर आभार बार असोशिएशनचे सचिव अॅड. आशुतोष भोसले यांनी मानले.