Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कायदा हा ढालीसारखा वापरावा तलवारी सारखा वापरू नये- न्यायाधीश स्वानंदी वडगावकर ; भादलवाडीत विधी मार्गदर्शनपर शिबीर संपन्न..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 27 November 2022, 19:55

सागर जगदाळे

भिगवण : “मुळ कायदा म्हणजे काय आहे हे जनसामान्यांना समजावे ह्या दृष्टीकोनातुन स्पष्टीकरण देऊन कायद्याचे ज्ञान सर्व सामान्यांना व्हावे, तसेच न्यायालयामध्ये न येता गावपातळीवर वाद मिटवावेत, त्यामुळे कायदा हा ढालीसारखा वापरावा तलवारीसारखा वापरू नये असे प्रतिपादन न्यायाधीश स्वानंदी वडगावकर यांनी केले.”

भादलवाडी (ता. भिगवण) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर नालसा पॅन इंडिया-महाराष्ट्र राज्य विधी समिती, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण, इंदापूर तालुक्यातील विधी सहाय्यक समिती व इंदापूर बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमानाने विधी मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्वानंदी वडगावकर या बोलत होत्या. सदर कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

 

यावेळी इंदापूर न्यायालयाचे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश के. सी. कलाल, न्यायाधीश श्रीमती शितल साळुंखे, न्यायाधीश श्रीमती ज्योती खटावकर, विधी मार्गदर्शन शिबीर प्रसंगी इंदापूर बार असोशिएशन मधील जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. डी. एस. पाटील, अ‍ॅड. पी. एस. वाघमोडे, अ‍ॅड. के. डी. यादव, अ‍ॅड. बी. आर. चव्हाण, अ‍ॅड. एन. आर. कदम, अ‍ॅड. दादा गिरंजे, अ‍ॅड. विशाल मल्लाव, अ‍ॅड. अश्पाक सय्यद, अ‍ॅड.राहुल जाधव, अ‍ॅड. समीरन पोळ, अ‍ॅड. स्वप्नील जगताप, अ‍ॅड.संदिप बांदल, अ‍ॅड.प्रज्योत शिंदे, अ‍ॅड. अक्रम शेख, अ‍ॅड. समीरन पोळ, अ‍ॅड. लोहकरे, व न्यायालयीन कर्मचारी संतोष गायकवाड, म्हस्के व भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.

यापुढे बोलताना स्वानंदी वडगावकर म्हणाल्या, “आपआपसामध्ये तडजोड केली तर वादी व प्रतिवादी हया दोन्ही पक्षकारांचा विजय होतो हार कोणाचीही होत नाही.” याप्रसंगी इंदापूर न्यायालयाचे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश के.सी. कलाल, न्यायाधीश श्रीमती शितल साळुंखे, न्यायाधीश श्रीमती ज्योती खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उपस्थित न्यायाधीश स्वानंदी वडगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, या शिबीरामध्ये अ‍ॅड. एन. जी. शहा  यांनी “शेत जमीन मोजणी संदर्भातील कायदे “याविषयी मार्गदर्शन केले, अ‍ॅड. राकेश शुक्ला यांनी ‘शेतीविषयक कायदे’ यावरती मार्गदर्शन केले. अ‍ॅड. सचिन चौधरी यांनी ‘महिलांचे विषयी कायदे व त्यांचे हक्क’ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच अ‍ॅड. शाम शिंदे यांनी ‘रजिस्टर पध्दतीने जमीनीची खरेदी विक्री करताना घ्यावयाची काळजी या विषयावरती मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. मधुकर ताटे यांनी सुत्रसंचालन अ‍ॅड.माधव शितोळे यांनी केले तर आभार बार असोशिएशनचे सचिव अ‍ॅड. आशुतोष भोसले यांनी मानले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

चांगल्या झोपेसाठी रात्री नव्हे दिवसा समस्यांचा विचार करा, पुरेशा झोपेसाठी 'हे' करा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.