Land Titling Act : पुणे : महाराष्ट्रातील मालमत्ता धारकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि क्रांतीकारक बातमी समोर आली आहे. येत्या जुलै महिन्यापासून राज्यात ‘लॅण्ड टायटलिंग ॲक्ट’ (जमीन मालकी हक्क कायदा) लागू करण्यात येणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. Land Titling Act
या कायद्यामुळे नागरिकांच्या मालमत्तांना केवळ अधिकृत मालकी हक्कच मिळणार नाही, तर त्याचा जागतिक स्तरावर आर्थिक व्यवहारांसाठीही वापर करता येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. Land Titling Act

भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार विश्वजीत कदम आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महसूल मंत्र्यांनी केवळ जमिनीच्या व्यवहारांतच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. Land Titling Act
यामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मोफत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरणांतर्गत १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, १.५ लाख विद्यार्थ्यांना अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचे मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपरची गरज उरलेली नसून, विविध प्रमाणपत्रे विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. Land Titling Act
भारती विद्यापीठाचा नागपुरात विस्तार होणार
दिवंगत पतंगराव कदम यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना बावनकुळे म्हणाले की, ‘गल्लीतली शाळा ते जागतिक विद्यापीठ’ हा प्रवास थक्क करणारा आहे. नागपूर येथे भारती विद्यापीठाचा विस्तार व्हावा, अशी इच्छा व्यक्त करत त्यासाठी आवश्यक जागा आणि सर्व प्रकारचे शासनस्तरीय सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. Land Titling Act
दरम्यान, लॅण्ड टायटलिंग ॲक्ट (जुलै २०२६ पासून लागू), मालमत्तांना अधिकृत मालकी हक्क आणि जागतिक व्यवहारांसाठी पात्रता, ३० लाख विद्यार्थ्यांना मोफत महसूल कागदपत्रे, या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील जमिनींच्या वादांना चाप बसणार असून, मालमत्तांच्या किमतींना आणि पारदर्शकतेला मोठी चालना मिळणार आहे. Land Titling Act







