Daund News : दौंड, (पुणे) : दौंड शहरातील खाटिक गल्ली परिसरातून पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५० किलो गोमांस जप्त करण्यात आले. शनिवारी (ता. 09) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. Daund News

अलिम मुस्ताक शेख (वय-35, रा. खाटिक गल्ली, दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 8 हजार रुपये किमतीचे 50 किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नजीर गफूरभाई तांबोळी यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. Daund News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या सुमारास खाटिक गल्लीतील ईदगाह मैदानाजवळ असलेल्या झाडाझुडपांमध्ये आरोपी अलिम शेख हा गायीची कत्तल करून मांस कापत असताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी, दौंड यांना पाचारण केले. त्यांनी घटनास्थळी मांसाची पाहणी करून काही नमुने (सॅम्पल) पुढील तपासासाठी सील केले. Daund News
जप्त केलेले मांस हे नाशवंत आणि मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने, दौंड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने नगरपालिका हद्दीतील मोकळ्या जागेत खोल खड्डा खोदून ते पंचांसमक्ष पुरण्यात आले. Daund News
दरम्यान, दौंड पोलिसांनी आरोपी अलिम शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ सी, ९ ए, ९ बी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल लवटे करत आहेत. Daund News







