Collector’s Office : पुणे, : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी मोठा गोंधळ उडाला, जेव्हा एका युवकाने थेट इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. या थरारक प्रकारामुळे काही काळ संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. Collector’s Office
राम पाचकाळ असे संबंधित युवकाचे नाव असून, तो आपल्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. प्राथमिक माहितीनुसार, राजगड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या कथित अतिक्रमणाचे व्हिडीओ चित्रीकरण करत असताना काही जणांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. Collector’s Office

मात्र, मागणीवर तातडीने कारवाई होत नसल्याची भावना झाल्यानंतर राम पाचकाळ यांनी अचानक पाचव्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर चढत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसर बंदिस्त करून जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत युवकाला सुखरूप खाली उतरवले. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. Collector’s Office
दरम्यान, पोलिसांनी युवकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून, त्याने केलेल्या मारहाणीच्या आरोपांचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. Collector’s Office





