Yerwada News : पुणे : येरवडा खुल्या जिल्हा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कारागृह परिसरात सापडलेल्या बेवारस मोबाईलच्या चौकशीची भीती वाटल्याने संबंधित कैद्याने पळ काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Yerwada News :
संतोष लक्ष्मण भिंगारे असे फरार कैद्याचे नाव असून, तो भुईज पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. कारागृहातील तुती बाग परिसरात सिमकार्ड नसलेला मोबाईल आढळून आल्यानंतर प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. Yerwada News :

दरम्यान, “जेवण करून येतो,” असे सांगून गेलेला भिंगारे परत न आल्याने कारागृह प्रशासन सतर्क झाले. त्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र तो सापडला नाही. अखेर याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फरार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. Yerwada News :
घटनेनंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. Yerwada News :







