Kitak Gang| पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवडच्या गुंड विरोधी पथकाने कीटक गॅंग ची तळेगावमध्ये धिंड काढली आहे. तसेच यापुढे कुठलीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. असा कडक इशाराही पथकाने गुन्हेगारांना दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून कीटक गॅंग गंभीर गुन्ह्यात सहभागी होत असल्याचे आढळल्याने नुकतच दरोडा आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.
कीटक भालेराव, वैभव विटे, विशाल मुंजाळ, प्रदीप वाघमारे, ऋतिक मेटकरी, आर्यन गरुड जुवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील कीटक भालेराव याच्यावर दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर, वैभव विटे याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत.
तळेगावामध्ये गुंड विरोधी पथकाने काढली ”कीटक गॅंग”ची धिंड…
कीटक गॅंगने सर्व गुन्हे तळेगाव हद्दीत केल्याने त्यांची धिंड काढून भयमुक्त तळेगाव करण्याचा मानस गुंड विरोधी पथकाचा आहे. अशाच पद्धतीने गुन्हेगारांवर पोलिस वरचढ झाल्यास मावळमधील गुन्हेगारी नक्कीच कमी होऊ शकते. पोलिस आयुक्त विनायक चौबे यांचं देखील मावळमधील गुन्हेगारीवर विशेष लक्ष आहे.
दरम्यान, १२ मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर तळेगावातील वातावरण तापले होते. तळेगावमधील गुंडगिरी कमी करण्यासाठी गुंड विरोधी पथक तळेगाव येथे ठाण मांडून बसले आहे. तळेगावात सुरू असलेली भाईगिरी आणि गुन्हेगारी कमी करण्याचे आव्हान पिंपरी- चिंचवड पोलिसांसमोर आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : पुण्यात खुनाचे सत्र सुरुच! दांडेकर पुलाजवळ एकाचा निर्घृण खून