युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर, ता.११ : मृग नक्षत्रात पाऊस होऊन खरीपाच्या पेरण्या होतात. मात्र आता श्रावणातील अधिक महिना उलटत चालला असून शिरूर तालुक्यात अद्यापही पाऊसाने हजेरी न लावल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात बाजरी तसेच कडधान्य पिकवले जाते. मात्र या वर्षी अजूनही पेरण्या नसल्याने यापुढे पेरण्या होतील की नाही. या चिंतेत शेतकरी आहे. काही शेतकऱ्यांनी ओल करून बाजरी ची पेरणी केली त्यांना देखील पाऊस नसल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे.(Shirur News)
मृग नक्षत्रात पाऊस होऊन खरीपाच्या पेरण्या.
शिरूर तालुक्यात खरीप हंगामात बाजरी, भुईमूग, सोयाबीन या बरोबर मूग, मटकी. वाल सारखे कडधान्य पिके घेतली जातात. मात्र या वर्षी पावसाने उघडीप दिल्याने कडधान्य पिके घेतली गेली नाही. त्यामुळे या वर्षी कडधान्यांची चणचण भासणार आहे.(Shirur News)
या काळात शेतकऱ्यांच्या हातात कडधान्य विकून काहि काही ना अर्थांजन होत असते. मात्र कडधान्य नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. काही भागात महागडे बियाणे घेऊन बाजरी व सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली होती. मात्र पावसाने उघडीप दिल्याने ही पिके धोक्यात आली आहेत.(Shirur News)
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात घोड व कुकडी नदीच्या बंधाऱ्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. मात्र या वर्षी या नद्या देखील कोरड्या पडल्याने इतर नगदी पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी नळपाणी पुरवठा या नदीवरून होत असल्याने पाणि टंचाई भिषण रूप घेऊ लागले आहेत.(Shirur News)
दरम्यान, या वर्षी पावसाने उघडीप दिली असून खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. या पुढे देखील बाजरी ची पेरणी होईल की नाही. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने याबाबत दखल घेऊन दुष्काळ जाहिर करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग करू लागला आहे.(Shirur News)
भाऊसाहेब औटी (माजी सरपंच काठापूर ता. शिरूर)
श्रावणाच्या दरम्याने पिकांना फुले येऊन पिके जोरदार डोलत असतात. सध्या अधिक मास सुरू असून श्रावणाची चाहूल लागली आहे. या दरम्यान देखील पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने या बाबत पंचनामे करून दुष्काळ जाहिर करावा. अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.(Shirur News)
अरूणा घोडे सरपंच टाकळी हाजी