अजित जगताप
सातारा : बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ग्रामीण कारागीर विकास ग्रामोद्योग निर्माण केला आहे. परंतु ,या विभागाला सातारा जिल्ह्यात कर्मचारी नसल्याने तीन कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सुमारे ११ सचिवांचा कारभार दिला गेला आहे.
सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यात ११ सचिव व सहाय्यक सचिव११ अशा २२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. परंतु, सध्या फक्त तीन कर्मचारी कार्यरत आहेत. पूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज प्रकरणे केले जात होती. आता ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कर्ज प्रकरण केली जातात.
दुष्काळी भागातील खटाव तालुक्यामध्ये आतापर्यंत एक हजार प्रकरणे मंजूर केलेले असून अनेक कारागिरांना रोजगार मिळालेला आहे. यापुढेही रोजगार मिळवण्यासाठी खटाव तालुका ग्रामीण कारागीर विकास ग्राम उद्योग संस्था प्रयत्नशील आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन परेश जाधव यांनी दिलेले आहे.
आठवड्यातून किमान तीन दिवस या कार्याला भेट देऊन चेअरमन जाधव हे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असल्याने होतकरू कारगीर व पालकवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. सचिव बर्गे हे ग्रामीण भागातील युवकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत आहेत. तसेच कर्ज प्रकरणाबाबत नोटिसा पाठवून देत आहेत. त्यामुळे कर्जदारांनी ही कर्जाची परतफेड करावी असे आवाहन युवा उधोजक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, अजित कंठे, तुषार बैले यांनी केले आहे.