Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतन हत्याप्रकरण अपडेट! डोळ्यांत अश्रू, मनात न्यायाची आस; आईची थेट पंतप्रधान मोदींना भावनिक साद…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 July 2026, 14:12

पुणे : पुण्यातील बहुचर्चित ‘ केतन’ हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि भावनिक वळण मिळाले आहे. या प्रकरणात बळी पडलेल्या केतन अग्रवालच्या आईने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक अत्यंत भावुक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. या पत्रामुळे सोशल मीडियासह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पत्रात आपल्या भावना व्यक्त करताना केतनच्या आईने लिहिले आहे की,”इतर सामान्य मातांप्रमाणेच मीसुद्धा माझ्या मुलाच्या सुखी आयुष्याची, त्याच्या लग्नाची आणि आमच्या म्हातारपणाच्या आधाराची सुंदर स्वप्ने पाहिली होती. पण, मला माझ्याच हाताने माझ्या तरुण मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागले, यापेक्षा मोठे दुःख काय असू शकते? माझ्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्यासोबतच आमचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले.”

घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, केतनच्या खोलीत आणि कपड्यांमध्ये त्याचीच आठवण येत असल्याचे सांगत त्यांनी, जोपर्यंत केतनला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

नेमकी घटना काय होती?

पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हा काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्यानंतर तपासात समोर आले की, लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून तब्बल 400 फूट खोल दरीत ढकलून केतनची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही भयानक घटना 18 जून रोजी घडली होती.

 

या हत्येचा कट इतर कोणी नसून केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच रचला होता. केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाला होता आणि लवकरच त्यांचे लग्न होणार होते. मात्र, सियाचे चेतन चौधरी नावाच्या दुसऱ्या एका तरुणावर प्रेम होते. याच प्रेमाच्या त्रिकोणातून आणि वादातून सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनचा काटा काढण्याचा कट रचला. त्यांनी फिरण्याच्या बहाण्याने केतनला लोहगडावर नेले आणि तिथून त्याला दरीत ढकलून दिले.

या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरवून सोडले होते. आता थेट पंतप्रधानांकडे या प्रकरणात न्यायाची याचना केल्यामुळे पोलीस तपासाला आणि या खटल्याला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.,

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:36

“मी पण गे आहे, आपण भेटायचं का?” म्हणत तरुणाला बोलावलं अन् पुण्यात पडक्या खोलीत नेल्यानंतर २२ वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 3 October 2026, 15:28

“पुण्यात 22 तासांत 123 मुली बेपत्ता?” व्हायरल ऑडिओ-रीलने खळबळ; पोलिसांनी सांगितलं सत्य

Saturday, 3 October 2026, 15:27

6 वर्षांची नीना टॉयलेटकडे निघाली अन् कॉकपिटमधलं दृश्य पाहून आई हादरली, विमानात नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 3 October 2026, 15:26

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास अभियंता-ठेकेदारांवर होणार गुन्हा दाखल; 7 दिवसांत रस्ते दुरुस्तीचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:24

‘माझा मुलगाही त्या सहलीला गेला’ आळंदी पोलीस ठाण्यात बैठकीतच मृत्यूची यादी समोर आली; सर्व पोलिसांचे डोळे पाणावले, काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

Saturday, 3 October 2026, 15:24
Next Post

सुवर्णनगरीत दरांची मोठी घसरण! सोनं 1000 रुपयेनं तर चांदी 16,000 ने स्वस्त, ग्राहकांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp