गणेश सुळ
Kedgaon News केडगाव : चौफुला (ता. दौंड) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) सेवकांची सहकारी पतसंस्थेची (पुणे) पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. (Kedgaon News) यामध्ये दौंड तालुक्याचे विभागीय अधिकारी निलेश थोरात यांची सेवकांच्या पतसंस्था चेअरमनपदी, वरवंड शाखेचे विकास अधिकारी प्रेमचंद भागवत यांची संचालकपदी व बँकेचे राहू शाखेचे विकास अधिकारी विकास कांबळे यांची दौंड तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली. या सर्व नवनियुक्त संचालकांचा आज सत्कार करण्यात आला.
माजी आमदार रमेश थोरात यांची प्रामुख उपस्थिती
यावेळी निवड झालेल्या चेअरमन, व्हॉईस चेअरमन व संचालक यांचा सत्कार समारंभ जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक माजी आमदार रमेश थोरात, चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, व्हा चेअरमन सुनील चांदरे यांच्या हस्ते पार पडला.
३१ मार्च २०२३ अखेर सेवक संस्थेचे १०२८ सभासद आहेत. भागभांडवल ८४ कोटी असून, सभासद ठेवी ३८ कोटी तसेच सभासद कर्जवाटप ५४ कोटी आहे. चालू वर्षी पतसंस्थेला १५९ लक्ष रुपयांचा नफा झाला आहे.
यावेळी बँकेचे कर्मचारी संचालक अंकुश उभे, रवींद्र जोशी, बँकेचे अधिकारी गिरीश जाधव, संजय शितोळे, डॉ. कदम, सुनील खताळ तसेच दौंड खरेदी विक्री संघाचे चेअरमन विश्वासराव भोसले, संचालक तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्याचे विभागीय अधिकारी, वसुली अधिकारी व बँकेचे आजी-माजी कर्मचारी, सेवकवर्ग आदी उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाचे आयोजन दौंड तालुक्यातील बँकेच्या सेवकांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन लाभले.