पुणे : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत 16 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, हवामानातील बदल लक्षात घेता केदारनाथ यात्राही पुढे ढकलण्यात आली आहे.
रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे की, यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडण्याची भीती आणि सोनप्रयागमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
पावसामुळे केदारनाथ महामार्गावरून प्रवास करणे कठीण होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने दररोज प्रवाशांची संख्याही कमी होत आहे.
यापूर्वी मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर दगड पडत असल्याने महामार्गावरून प्रवास करणे धोकादायक होत होते.