उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्याणी संदिप हगवणे यांची सोमवारी (ता. 06) बिनविरोध निवड करण्यात आली. नायगावच्या सरपंच अश्विनी योगेश चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे मंडल अधिकारी गिताश्री काळे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी कल्याणी हगवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने गिताश्री काळे यांनी कल्याणी हगवणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
निवडणूक कामकाज साठी ग्रामसेविका विजया भगत, तलाठी महादेव भारती यांनी सहकार्य केले. कल्याणी हगवणे यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बापुसाहेब चौधरी, उपसरपंच दत्तात्रय बारवकर, गणेश चौधरी, जितेंद्र चौधरी, संगीता शेलार, आरती चौधरी, पल्लवी गायकवाड, उतम शेलार, बाळासाहेब गायकवाड, प्रियंका गायकवाड, सुरेश हगवणे, कृष्णा चौधरी, विजय चौधरी, विकास चौधरी, गणेश चौधरी, शिवाजी चौधरी, माया चौधरी, कल्पना पवार, मनिषा माने, पोलीस पाटील अर्जुन पवार, दत्तात्रय चौधरी, रामचंद्र पवार, संतोष हगवणे, विठ्ठल चौधरी, ज्ञानोबा शेलार, पोपट चौधरी, उत्तम घुले, योगेश चौधरी, नितीन हगवणे, डॉ. हेमंत चौधरी, रामचंद्र माने , संजय चौधरी, विजय चौधरी, अर्जुन चौधरी, विठ्ठल हगवणे, गुलाब चौधरी, किरण गुळुंजकर कैलास चौधरी,भाऊसाहेब चौधरी, नवनाथ गायकवाड, संजय कामठे, किरण चौधरी, अविनाश चौधरी, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच कल्याणी हगवणे म्हणाल्या कि, “नायगाव ग्रामपंचायतीत प्रभारी माजी सरपंच राजेंद्र रतन चौधरी गटाचे 11 पैकी 8 सदस्य निवडून आले होते. यामुळे गटाची एकहाती सत्ता आहे. सरपंच पद खुला प्रवर्ग असल्याने गावची चालू असलेली विकास कामे सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.”