Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्यायमूर्ती उदय उमेश ललित भारताचे ४९ वे सरन्यायाधीश…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 August 2022, 18:41

पुणे :  केंद्र सरकाच्या अधिसूचनेनुसार, न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची बुधवारी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती ललित यांना २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ दिली. तसेच ललित ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ ७४ दिवसांचा असेल.

 

मुख्य न्यायमूर्ती यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना हात जोडून अभिवादन केले. रजिस्टरवर सही केली, त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतींना हात जोडून अभिवादन केले. त्यानंतर न्यायमूर्ती ललित व्यासपीठावरुन खाली उतरले आणि पहिल्या रांगेत एका कोपऱ्यात बसलेल्या आपल्या वडिलांच्या समोर जाऊन उभे राहिले. वरिष्ठ वकील असलेले यू आर ललित यांच्या पायाला हात लावून त्यांनी वडिलांचे आशीर्वाद घेतले. हे दृश्य पाहून राष्ट्रपती भवनात असलेल्या सगळ्यांनाच सर्वोच्च न्यायमूर्तींबाबतचा आदर वाढला. त्यावेळी एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर ललित यांनी परिवारातील इतर सदस्यांनाही वाकून नमस्कार केला.

 

LIVE: Swearing-in-Ceremony of the Chief Justice of India Justice Uday Umesh Lalit https://t.co/iR0G7nmRKF

— President of India (@rashtrapatibhvn) August 27, 2022

जस्टिस ललित यांचा कार्यकाळ ७४ दिवसांचा असणार आहे. ते आठ नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत. त्यांच्यानंतर सर्वात अनुभवी न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे मुख्य न्यायमूर्ती होतील. न्यायमूर्ती ललित यांना वकिलांच्या बार संघटनेतून २०१४ साली थेट सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती केले होते. त्यांच्यापूर्वी हा मान न्यायमूर्ती एस एम सिकरी यांना १९७१ साली मिळाला होता. शनिवारी आयोजित या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, कायदेमंत्री किरण रिजिजू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, न्यायमूर्ती ललित यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ साली झाला होता. ते महाराष्ट्रातील आहेत. १९८३ साली त्यांनी वकिलीची सुरुवात मुंबई हायकोर्टातून केली होती. त्यानंतर १९८६ साली ते दिल्लीला शिफ्ट झाले. तिथे गुन्हेगारीच्या प्रकरणात चांगले वकील असा नावलौकिक त्यांनी मिळवला. २ जी केसमध्ये त्यांना २०११ साली सुप्रीम कोर्टात विशेष सरकारी वकील नेमण्यात आले. १३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांना थेट सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

गुजरात सरकारने बिलकीस बानो प्रकरणातील ११ आरोपीची निर्दोष सुटका केल्याच्या निषेधार्थ परंडा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपतीना निवेदन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.