पुणे : सरकारी विभागात नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, स्पर्धा परीक्षा असो वा इतर परीक्षांच्या माध्यमातून नोकरीचा प्रयत्न केला जातो. पण आता तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, संबंधित विभागाकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मुंबई येथे मुख्य कायदेशीर सल्लागार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मुख्य कायदेशीर सल्लागार.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण: मुंबई.
– वयोमर्यादा : 65 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक महाव्यवस्थापक (HR/RC), रिक्रूटमेंट सेल, महावितरण, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-51