पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, काही रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत इन्स्ट्रुमेंट मेक, प्रशिक्षक, एचआर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : इन्स्ट्रुमेंट मेक, प्रशिक्षक
– एकूण रिक्त पदे : 01 पद
– नोकरीचे ठिकाण : पिंपरी, पुणे.
– शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग / पदवी, एनटीसी / एनएसी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 जानेवारी 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2025