पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, धुळे येथे अंगणवाडीत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 22 एप्रिल, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
धुळे येथे अंगणवाडीत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला धुळे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 21 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही आता केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्जही करता येणार आहे. त्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी (सिव्हिल) यांचे कार्यालय, धुळे शहर, ३० गरुड कॉलनी, जय हिंद कॉलनी, देवपूर जवळ, धुळे -४२४००२ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस.
– एकूण रिक्त पदे : 21 पदे.
– नोकरीचे ठिकाण : धुळे.
– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण.
– वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 03 एप्रिल 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://dhule.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.