सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त उप अभियंता या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 5 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त उप अभियंता.
– एकूण रिक्त पदे : 05 पदे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, आकुर्डी, पुणे – 411044.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल : [email protected]
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.pmrda.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.