job alert : पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता तुमचा हा प्रयत्न थांबण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महापालिकेत विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 42 रिक्त पदे भरली जाणार असून, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला पुण्यात जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
पुणे महापालिकेत फोटोग्राफी, व्हिडिओ शुटिंग व फोटो लॅमिनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, बायरिंग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक, फ्रिज एसी दुरुस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, पशू वैद्यकीय अधिकारी (व्हेटरनरी ऑफिसर) या पदांवर भरती केली जात आहे.
या भरती प्रक्रियेत 26 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराला ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
पुणे महापालिकेत एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक, ब्युटीपार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक या पदांसह इतर अनेक पदे भरली जाणार आहेत.
कुठं पाठवावा अर्ज?
– जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे येथे हा अर्ज पाठवावा लागणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती ऑनलाईनही घेता येऊ शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://www.pmc.gov.in/ वर जाऊन माहिती घेता येणार आहे.